विपुल दयाघन गर्जे तव ह्रदयांबरि श्रीरेणुके हो ।
पळभर नर-भोराची करुनावाणी ही आयके हो ॥ धॄ. ॥
श्रमलिस खेळुनी नाचुनि गोंधळ घालुनी ब्रम्हांगणी हो ।
निजलिस कशी दिनांची चिंता सोडुनी अंतःकरणीं हो ।
उठ लवकर जगदंबे, त्रेलोक्याची तूं स्वामिणी हो ।
विधि-हरी-हर अज्ञानी, पूर्ण ज्ञानी तूं शाहणी हो ।
समर्थ परमेश्वरि तूं, अनंत ब्रह्माण्डनायके हो ॥ १ ॥
शरणागत मी आलों, परि बहु चुकलो बोलावया हो ।
तुज जननीचें नातें लाज न वाटे लावावया हो ।
परि तूं जननि दिनांची, अनाथांची बहु तुज दया हो ।
हि श्रुती सत्याsसत्य कीं, अनुभव आलोमी पहावया हो ।
कळेल तैसे करि, परि निज ब्रीद रक्षी मां पालके हो ॥ २ ॥
भवगदें पिडलों भारी, मजला दुःख हे सोसेनाहो ।
अझुनी अंबे, तुजला माझी करुना कां येइ ना हो ।
तारी अथवा मारी, धरिलें चरण मी सोडिना हो ।
कृपा केल्यावांचुनी परतुनी विन्मुख मी जाइ ना हो ।
तुजविण जगिं कोणाचें वद प्रद प्रार्थावे अंबिके हो ॥ ३ ॥
ऐकुनि करुणावाणी ह्रदयी सप्रेमें द्रवली हो ।
प्रसन्नमुख जगदंबा, अंबा प्रसन्न जाहली हो ।
अजरामर वर द्याया, प्रकटुनि पुढें उभी रहिली हो ।
भक्तांकित अभिमानी विष्णुदासाची माउली हो ।
जी निज इच्छामात्रें सूत्र हालवी कौतुकें हो ॥ ४ ॥
Monday, February 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
🙏🙏
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteखूप छान अगदी माहूर ची आठवन आली नवरात्री च्या आरत्या आठवल्या जय जगदंब..
ReplyDeleteKhara mhanalat agdi mahurchi athavan ali
Delete🌺
ReplyDeleteKhupch chhan
ReplyDeleteJai jagdamb 🙏🙏🙏
ReplyDelete