अज्ञान अंधार पडलासे दाट | आता मज वाट दाखवावी || १ ||
कड़ाडटी झाडे मोड़ताती काटे | आदळती गोटे वेळोवेळा || २ ||
कल्पनेच्या संगे वाढल्या आगळ्या | वासनेच्या जाळ्या चहुकडे || ३ ||
कामक्रोध व्याघ्र लांडगे अजगर | दुःखाचे डोंगर मोठेमोठे || ४ ||
आता लवकरी येई माझे आई | उचलोनी घेई कड़ेवरी || ५ ||
विष्णुदास म्हणे येऊ देई कीव | घाबरला जीव तुझसाठी || ६ ||
Thursday, February 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment