|| श्री रेणुका परमेश्वरी ||

|| श्री रेणुका परमेश्वरी ||
नको साधन धन काहि । काम स्तवनाचे नाही ॥
तुला रेणुके बाई । आई, बोलने पुरे ॥

Thursday, February 4, 2010

ऐसी अंतर पारखी । कोन रेणुकेसारखी

ऐसी अंतर पारखी । कोन रेणुकेसारखी ॥ १ ॥
सर्व साक्षिनी डोळस । कदा करीना आळस ॥ २ ॥
जाणें दिनची कळवळ । धांवुनिया ये जवळ ॥ ३ ॥
मागुं नेणे बाळ तान्हे । माय पुरवी भुक तहान ॥ ४ ॥
कल्पलतिका मना ही । विकल्पाचें काम नाही ॥ ५ ॥
मना तिचा तूं कंटाळा । करुं नको रे चांडाळा ॥ ६ ॥
विष्णुदास म्हने माझी । माय प्रेमामॄत पाजी ॥ ७ ॥

No comments:

Post a Comment