Tuesday, February 9, 2010
आपुलीया बाळा आपुलीया करीं
आपुलीया बाळा आपुलीया करीं ।
मारी परि दूरी धरुं नको ॥ धॄ. ॥
आपुलीया हातें कापावी ही मान ।
जगात अपमान करुं नको ॥ १ ॥
श्वानापरी ठेवी आपुल्या संग्रही ।
परी परगॄहीं धाडूं नको ।
वाढवावे प्रेम पुरवावें कोड ।
ममतेचा मोड मोडूं नको ॥ ३ ॥
भवनदीमाजी चाललों वाहत ।
आतां मागें हात काढूं नको ॥ ४ ॥
विष्णुदास म्हणे अगे जगन्नाथे ।
जननीचें नातें सोडूं नको ॥ ५ ॥
Subscribe to:
Post Comments (Atom)
This comment has been removed by the author.
ReplyDelete