|| श्री रेणुका परमेश्वरी ||

|| श्री रेणुका परमेश्वरी ||
नको साधन धन काहि । काम स्तवनाचे नाही ॥
तुला रेणुके बाई । आई, बोलने पुरे ॥

Wednesday, January 27, 2010

जय जय रेणुके, सदा सदय तू प्रसन्न रुपमुर्ती

जय जय रेणुके, सदा सदय तू प्रसन्न रूपमूर्ती|
मृगराजाचल पावक अघनग दाहक महिवरती |
सिद्ध साधूसम पतीत पापी नर नमने उद्धरती || ध्रु. ||

दिनरक्षक, जगसाक्ष, यशध्वज चुंबित गगनाला |
अति उत्कंठीत देवमुनी जन येती नमनाला |
तारिसी त्यांसी वाटे हे मम कौतुक न मनाला |
उदंड तरति मजसम नर जे दुरीते आचरती || १ || जय० ||
विषयप्रपंची गुंतुनी नर जे जगी वाया गेले |
ते अनुकंपामृत-घन वर्षूनी त्वां पावन केले |
चंड-मुंड तव शत्रू परंतू मोक्षपदी बसले |
सांप्रत मजप्रति ताराया का धरिली मनी अढि ती || २ || जय० ||
सन्मुख घट स्थापित, लोंबती सुमनांच्या माळा |
कंठी मुक्तहार, कटीं शोभतो पीताम्बर पीवळा| |
वांच्छिती विधि हरिहर, त्वत्पदरज लागो तरी भाळा |
तव गुणमहिमा भक्त विरामा निशिदिनीं मुखी गाती || ३ || जय० ||
नवदिनी नवरात्रीं पर्वतीं, वाद्यध्वनि गर्जे |
अंब, अंब, जगदंब, उदय, रव दिग्मंडळी गाजे |
जगज्जननी हे दिन दयाळे, नांव तुला साजे |
विष्णुदास म्हणे , करि करुणालाये करूणा मजवरती ॥ ४ ॥ जय० ॥

आरती दुसरी

जयदेवी जयदेवी जयजय एकविरे
श्रीरेणुके जय जननी जगदोद्धारे ||जयजय.|| धृ ||

आदि नमोस्तुते सकळारंभे आनंते |
जय उदयोस्तु नारायणी श्रीभगवंते |
जय जगदम्बे ! अंबे ! परम कृपावंते |
जय षड्गुनैश्वर्यालंकृत श्रीमंते || जय १ ||

श्रीमृगराजाचल मुलापिठासन मूर्ती |
सतत विराजे गाजे दीग्मंडळी कीर्ति |
न्हानिती नित्य सरस्वती यमुना भागीरथी |
सुरवर मुनिजन भावें पुजार्चन करिती || जय. २ ||

मुगुट कुंडले मंडित पीताम्बर पीवळा |
कुंकुम कज्जल केशर उटी कंकणमाळा |
कनक-स्तंभ-मय-मंडपी शोभे वेल्हाळा |
त्रिकाळ होतसे मंगळ भुवनीं सुखसोहळा || जय ३ ||

घालोनी रांगुळी उजळुनी धुपदिप सुगंधी |
सुवार्नपात्री पंचामृत क्षिर बासुंदी |
वरणभात घृत पापड़ दळ बेसन बुंदी |
प्रार्थितो स्वस्थआनंदे जेवी आनंदी || जय. ४ ||

फल तांबूल दक्षिणा, सुभूषण सुमने |
भरली ओटी मोक्तिक माणिक मणि सुमने |
करूँ आरती वाहिली पुष्पांजली सुमने सुमने |
विष्णुदास म्हणे करि पुर्नार्चन सुमने || जय ५ ||

देवीच्या आरत्या

आरती पहिली

श्रीरेनुके, जय भगवंते, आनंते, जयवंते
दैत्य-निहंते ॥ श्रीरेनुके जय. ॥
हे शुभवदने ! चित्सुखसदने ! श्रीवरदत्ता श्रीमंते ॥ श्री. ॥ ध्रू॥
भव अंब उदित, जगदंब मुदित ! तूं सुरभी दुधित,
ये एककुदित । सदा आनंदित, सुरवरवंदित, प्रतिपाळ
क्षुधित, निज बाळ रुदित, तुज का न विदित, हे ह्रदयस्थे ||१||

मृगराजाचल शिखर सुमंडीत | कोरीभूमी मूळपीठ अखंडित,
चैतन्य कलादीप विश्वकरंडीत | पाप ताप दूरदैन्य कुरंडीत,
तू रमापंडित, हे ललिते || २ ||

श्रीदत्तात्रय योगि शास्त्रकर | सिद्ध देवदेवेश्वर शंकर |
सन्निध श्रीमहाकाली भयंकर | तू सिन्हासनस्थित करुणाकर |
ये लवकर हे भार्गवमाते || ३ ||

सच्चितघन महा ब्रम्हस्वरूपिणी | सकळ गूनसंपन्न शिरोमणी |
तू इंद्रायणी तू दाक्षायानी | विष्णुदास म्हणे नमो नारायणी |
हे सत्यज्ञानमनंते || ४ ||